दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

गोंदिया: 10 लाखाच्या खंडणीसाठी खुन; अटकेतील आरोपी शौचाचा बहाना करून पसार!

आमगांव पोलिस स्टेशन माधील घटना...

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया: दहा लाखांच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका 17 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी शौचाचा बहाना करत पोलिसांच्या हाताला तुरी देऊन पसार झाल्याची घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या आमगांव पोलिस स्टेशन मध्ये घडली आहे. (Gondia Crime News In Marathi)

दुर्गाप्रसाद हरिणखेडे (वय 24 रा. नवेगाव खैरलांजी, मध्यप्रदेश) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला असता सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला (Police) झटका देत भिंतीवरून उडी मारत फरार झाला.

आज पोलिस कोठडीत असलेला आरोपी पसार;

सदर आरोपीला चेतन खोब्रागडे या 17 वर्षीय मुलाच्या 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, खंडनी आणि खुनाच्या गुन्ह्यासाठी अटक झाली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसाची पोलिस कोठड़ी मिळाली होती. मात्र, आज पोलिस कोठडीत असलेला आरोपी पसार झाला आहे. आरोपी पसार झाल्याची घटना माहित होताच मृतकाच्या कुटुंबातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी आमगाव पोलीस ठाण्याकडे धाव घेतली असून पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी गोळा झालेली आहे. (Gondia News Updates)

हे देखील पहा-

याआधीही आरोपीचा मारहाणीत कोठडीत मृत्यू!;

विशेष म्हणजे यापुर्वी याच पोलीस ठाण्यात एका आरोपीचा मारहाणी दरम्यान पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यावेळी सुध्दा पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झालेले होते. आता पोलीस कोठडीतून आरोपी फरार झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून आरोपी पसार प्रकरणामुळे पुन्हा आमगाव पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. आता पोलिसांनी वेगवेगळी टीम तयार करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे आमगाव पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय एकमेकाला लागूनच असताना अशा प्रकार घडलाच कसा प्रश्न उभा ठाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT