Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News : दारूच्या नशेत घरी येऊन घातला वाद; संतापलेल्या बापाने मुलाची केली हत्या, देवरी तालुक्यातील घटना

Gondia News : हंसराजला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन घरी मुल्ला येथे पोहोचला. यानंतर घरी पोहोचताच त्याने आई-वडिलांबरोबर भांडण सुरू केले.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: दारूचे व्यसन लागलेल्या मुलाचे व्यसन काही केल्या सुटत नव्हते. यात दारू पिऊन घरात वारंवार वाद घालत होता. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या वडिलांनीच मुलाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मुल्ला गावात घडली आहे. 

हंसराज नारायण मुनेश्वर (वय ३२) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हंसराजने आपल्या पत्नीला तिच्या (Gondia) माहेरगावी सालई येथे पाठविले होते. हंसराजला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन घरी मुल्ला येथे पोहोचला. यानंतर घरी पोहोचताच त्याने आई-वडिलांबरोबर भांडण सुरू केले. भांडण एवढे विकोपाला गेले की वडील व मुलामध्ये मारहाण झाली. यातच बाप- लेकाच्या (Crime News) हाणामारीत मुलाच्या डोक्यावर वडिलांने दगडाने मारहाण केली असता मुलाचा यात जागीच मृत्यू झाला.  

संशयित आरोपीला घेतले ताब्यात 

सदर घटनेची माहिती गावात समजल्यानंतर याची माहिती गावाकऱ्यांनी देवरी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा केला. यानंतर देवरी पोलिसांनी संशयित आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT