Gondiya Crime News saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News: प्रेमविवाहाचा ह्रदयद्रावक शेवट! पत्नीपाठोपाठ पतीनेही मृत्यूला कवटाळले; परिसरात खळबळ

Gondia Soundad Crime: या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Soundad Crime News: गोंदिया जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर येत आहे. गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यात आधी पत्नीने आणि दोन दिवसांनी पतीनेही जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Couple End Her Life)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे शुक्रवारी डीकेश्वरी भुसारी या विवाहीत तरुणीने गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी तिचा पती दिगंबर भुसारी यानेही आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या भयंकर प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता. पती पत्नीने चार दिवसांच्या अंतराने आपले आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर भुसारी असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी डीकेस्वरी हीने याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नी नंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. (Gondiya Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

Mirzapur The Movie: गुड्डू पंडित आणि कालीन भैय्याचा भौकाल; मिर्झापूरमध्ये पुन्हा रंगणार रक्तरंजीत थरार

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

SCROLL FOR NEXT