गोंदिया : लॉजमध्ये 'प्रॉमिस डे' दिवशीच प्रेमी युगुलाची आत्महत्या! SaamTvNews
महाराष्ट्र

गोंदिया : लॉजमध्ये 'प्रॉमिस डे' दिवशीच प्रेमी युगुलाची आत्महत्या!

आत्महत्या करणाऱ्या युवकाने आपण हॉटेल एव्हरग्रीन मध्ये असल्याची माहिती आपल्या आईला दिली आणि त्यांनतर आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.

अभिजित घोरमारे

गोंदिया : गोंदिया (Gondia) शहरातील हॉटेल एव्हरग्रीन मध्ये काल रात्री एका प्रेमी युगलाने (Couple) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या (Suicide) केली असून सदर आत्महत्या कुठल्या कारणातून झाली याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलिस घेत आहेत. (Gondia Couple Suicide In Evergreen Hotel Latest News)

हे देखील पाहा :

नागपुरातील (Nagpur) 21 वर्षीय रोहिणी पवार व गोंदियातील (Gondia) 22 वर्षीय आकाश छेतीया हे दोघे जण काल या हॉटेलमध्ये मुक्कामी आले होते. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या मुलाने आपण हॉटेल एव्हरग्रीन मध्ये असल्याची माहिती आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला दिल्याने मृत युवकाच्या आईने एव्हरग्रीन हॉटेल गाठत वेटर च्या मदतीने रूम मध्ये जाऊन पहिले असता आकाश आणि रोहिणी हे दोन्ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.

दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गोंदियातील हॉटेल (Hotel) व्यावसायिक तरुण तरुणींना आपला स्वार्थ साधण्यासाठी खोली उपल्बध करून देत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. तर या घटनेनंतर गोंदिया पोलिस हॉटेल व्यवसायिकांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT