Gondia Accident Saam tv
महाराष्ट्र

Gondia Accident: लग्नाला जाताना वऱ्हाडावर काळाचा घाला, गोंदियात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Gondia Road Accident News: गोंदियात लग्नाला जाताना वऱ्हाडावार काळाने घाला घातला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने लग्नघरी शांतता पसरली आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

शुभम देशमुख, गोंदिया

Gondia Road Accident News:

राज्यात रस्ते अपघातांची मालिका सुरुच असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या महिन्याभरात रस्ते अपघातात शेकडो लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अशाच एका रस्ते अपघातात आणखी तिघांना जीव गमवावा लागला आहे. गोंदियात लग्नाला जाताना वऱ्हाडावार काळाने घाला घातला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने लग्नघरी शांतता पसरली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एकोडी दांडेगावात अपघाताची (Accidnet) घटना घडली आहे. या अपघातात पाच ते सहा प्रवासी जखमी झाले होते. तर अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांचा जागीच मृत्यू

लग्नाचं वऱ्हाड गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील एकोडी दांडेगावातून जुनेवाणी येथे जात होतं. लग्नाचं वऱ्हाड हे चारचाकी गाडीतून जातं होतं. त्याचवेळी नेमका अपघात झाला. या अपघातात दोघांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाचा रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला आहे. दांडेगावच्या चौकात ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेने लग्नघरी शोककळा पसरली आहे.

गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात

परभणीत गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. परभणीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुढी पाटीवर रात्री ही घटना घडली आहे. ट्रक चालक सुमित पंडितला ट्रक चालवताना डुलकी लागल्याने अपघात झाला. ट्रकचा अपघात झाल्यानंतर चालकाला आजूबाजूच्या नागरिकांनी बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT