Gold Price Today saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: 'सुवर्णनगरी'त २४ तासांत सोन्याचा भाव २ हजारांनी वाढला, १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Jalgaon Sarafa Market: जळगावच्या सुवर्णनगरीत पुन्हा सोन्याला चकाकी आली आहे. सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत सोन्याचे दर २ हजार रुपयांनी वाढले आहे. आजचे दर किती घ्या जाणून...

Priya More

संजय महाजन, जळगाव

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह ९८ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरातसुद्धा पाचशे रुपयांनी वाढ झाली असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख २ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोनं- चांदीच्या दरामध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. रशिया युक्रेनमध्ये जो करार होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे जिओ पॉलिटिकल टेन्शन आल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दारावर झाल्यास सोने व्यावसायिकांनी सांगितलं.

भविष्यात पुन्हा सोन्याचे दर वाढतील या भीतीने घरात लग्न असलेले मंडळी आजच सोने खरेदी करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी देखील जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT