GOLD PRICE  Saam Tv
महाराष्ट्र

आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनानंतर ग्राहकांनी शोधला अनोखा जुगाड

Gold silver rate : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. PM मोदींच्या आवाहनानंतर ग्राहकांचा सोने खरेदीचा कल कमी झाला आहे.

संजय महाजन

पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थिताचा भारतावर परिणाम

पंतप्रधानांकडून सोने खरेदी टाळण्याचे आवाहन

पंतप्रधानाच्या आवाहनानंतर ग्राहकांनी शोधला अनोखा जुगाड

जळगाव : पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सोने-चांदीवरील आयात कर देखील वाढवला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीवर होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सोने-चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान काही ग्राहकांनी अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

सध्या देशात लग्नसराईचे दिवस आहेत. या लग्नसराईत ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल असतो. परंतु पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीचा फटका ग्राहकांना बसताय. आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे खर्च कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यामुळे जळगावमधील ज्वेलर्सवर देखील पीएम मोदींच्या आवाहनानंतर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आता लग्न सोहळा आणि तसेच आवश्यक तेवढीच सोने-चांदीची खरेदी ग्राहकांकडून केली जात असल्याची माहिती हाती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर जुने दागिने मोड करून नव्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

सोने-चांदीच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसांमध्ये चार हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 26 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झालेली असली तरी ग्राहकांवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. सोने प्रति तोळे 1 लाख 63 हजारांना विक्री केली जात आहे. तर चांदी प्रति किलो 2 लाख 75 हजार GST सह विक्री केली जात आहे.

MCX वर सोने-चांदीच्या दरात घसरण

एमसीएक्सवरही सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. सोन्याच्या दर प्रति तोळ्यामागे ३४२३ घसरण होऊन १,५८,५५५ रुपयांवर पोहोचला आहे. दिवसभरात व्यवहाराच्या वेळेतही घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळे १,५८,१५० रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही प्रति किलोमागे २० हजारांची घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Artist Death: सिनेमाचा जादुई आवाज हरपला, ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Nepal Flood: काठमांडूहून मानसरोवरला गेला, फोन केला, फोटोही पाठवले अन् त्यानंतर...; नेपाळच्या महाप्रलयात कल्याणचा तरुण बेपत्ता

Raksha Bandhan Evening Muhurat: भावाला सकाळी राखी बांधता आली नाही; मग संध्याकाळी किंवा रात्री राखी बांधता येईल का? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Vastu Shastra Tips : बेडसमोर आरसा का ठेवू नये? आरोग्यापासून ते वैवाहिक जीवनापर्यंत होईल त्रास; वास्तुशास्त्र काय सांगत वाचा

Maharashtra News Live Update: मंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी बहिणींची झुंबड

SCROLL FOR NEXT