Gokul Milk Union headquarters in Kolhapur comes under administrator rule, triggering political debate. saam tv
महाराष्ट्र

अखेर गोकुळवर 'प्रशासकराज', गोकुळसाठी भाजपचा मोठा डाव?

Gokul Milk Union Administrator Kolhapur Political Shift: कोल्हापूरच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नेमणुक करण्यात आलीय... मात्र 65 वर्षात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक नेमण्याची वेळ का आली? मुश्रीफ आणि सतेज पाटलांची गोकुळवरील ताकद कमी करण्यासाठी भाजपनं काय रणनिती आखलीय ?

Suprim Maskar

गोकुळ दूध संघ…कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा… हजारो शेतकऱ्यांचा विश्वास… पण पहिल्यांदाच या संस्थेवर प्रशासक बसवला गेला आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. तब्बल 65 वर्षांत कधीही न घडलेल्या घटनेनं कोल्हापूरच्या राजकारणात अक्षरश: भूकंप झालाय..

कोल्हापूरच्या गोकुळात प्रशासकराज !

गोकुळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकाची नेमणूक करण्यात आलीय..मुदत संपल्यानं संचालक मंडळ बरखास्त करून, 'प्राधिकृत अधिकारी मंडळ' गोकुळ दूध संघ चालवणार आहे...त्यामुळे हसन मुश्रीफांना मोठा धक्का बसल्याची चर्चा असून भाजप समर्थक गटाची सरशी झाल्याची चर्चा आहे. जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक 'गोकुळ'चे नवे प्रशासकीय अध्यक्ष असणार आहेत... सहकार कायद्यातील तरतुदींनुसार उपनिबंधकांकडून हे नियुक्तीचे आदेश देण्यात आलेत...

खरतर महाडिक गटाचा प्रभाव असलेल्या गोकुळमध्ये पाच वर्षांपूर्वी सत्तांतर झालं... काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांच्या आघाडीने गोकुळवर सत्ता मिळवली…

गोकुळवर प्रशासकाच्या एंट्रीनंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय...प्रशासक नेमण्याचा निर्णय सतेज पाटील–हसन मुश्रीफ यांना गोकुळमधून बाहेर करण्यासाठी भाजपनं आखलेली रणनिती असल्याची चर्चा आहे...

मात्र गोकुळचा निकाल लागल्यावरच याप्रकरणावर भाष्य करेन, अशी सावध भूमिका मुश्रीफांनी घेतलीय... तसचं प्रशासक बसवण्याचा निर्णय जाणीवपुर्वक घेण्यात आला नसल्याचा दावा महाडिकांनी केलाय.

मात्र गोकुळवर प्रशासक बसवण्यात आला असला तरी जोपर्यंत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा प्रभाव कमी होत नाही… तोपर्यंत भाजपला गोकुळवर आणि जिल्ह्यावर पकड मजबूत करणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलयं... गोकुळ म्हणजे केवळ दूध संघ नाही… तर कोल्हापूरच्या अर्थकारणाच्या नाड्या नियंत्रित करणारी यंत्रणा आहे…अशावेळी सहकार टिकणार की राजकारण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय़.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT