गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
१० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीसाठी सभा होणार
महायुतीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित केल्याची चर्चा
गोकूळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीकडे अख्खा राज्याचं लक्ष लागलंय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्या १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्ष निवडीवरुन राज्यात मोठे राजकारण सुरु आहे. निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरूय. महायुतीने गोकुळ महासंघाच्या अध्यक्ष पदाबाबत आपले पत्ते उघड करत असून अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय.
महायुतीकडून शिवसेनेच्या नेत्याला अध्यक्षपदी बसवण्यात येईल अशी शक्यता वर्तुवली जातेय. महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अजित नरके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अजित नरके शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आहेत. यामुळे अध्यक्षपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळ्यात पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
कोल्हापूरात आज सतेज पाटील यांनी मोठा संघर्ष मोर्चा काढत आपले शक्ती प्रदर्शन केले. संघर्ष मोर्चातून सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. कोल्हापुरातून सत्ता बदलाची बीज पेरलं गेलंय असं म्हणत राज्याती सत्ता बदलून काढू अशा इशारा दिला. त्यावेळी त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र टाकलं. त्यानंतर सायंकाळी महायुतीकडून पत्रकार परिषद घेतली. हसन मुश्रीफ आणि महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. आमच्यापेक्षा केवळ एकच जास्त सदस्य त्यांचा निवडून आलाय.
मात्र सतेज पाटील असा कांगावा करत आहे की, साडेपाच लाख लोकांचा पाठिंबा फक्त त्यांनाच आहे. आम्ही रस्ता आणि कोर्टातील लढाई लढू. तीन सभा तहकुब झाल्या असत्या तर प्रशासक आले असते. आणि आम्हाला हे सहज करता आले असते. संचालक नेमल्यामुळे आता २५ लोकांमधूनच अध्यक्ष होणार आहे. मविआतील लोकांनी केवळ फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला.
कोणत्याही संस्था बायलॉजच्या आधारे चालतात. मात्र शासन हे रद्द करु शकते, असा फेक नरेटिव्ह सतेज पाटील यांनी पसरवला. आजच्या मोर्च्यात बाहेरचेच लोक जास्त होते, असाही आरोप धनंजय महाडिक यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत डेडलॉक तयार झाला होता तो सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारने हस्तक्षेप केला. आणि आता आरोप होतोय लोकशाहीची हत्या झाली आणि काळादिवस वगैरे कांगावा केला जातोय. सरकारला संघ ताब्यात ठेवायचा असता तर त्यावर प्रशासक ठेवला असता. परंतू सरकारने निवडणूक लावली होती. मात्र विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवल्याचं महाडिक यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.