Ranjit singh disale saam tv
महाराष्ट्र

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा; कारण काय ?

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjit singh disale) गुरूजींनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjit singh disale) गुरूजींनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे. डिसले गुरुजींनी हा राजीनामा ७ जुलै रोजी दिला. डिसले गुरूजींच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. (Ranjit Singh Disale News In Marathi)

डिसले गुरुजींचे काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागामध्ये वाद झाले होते. ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरूजी यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यांना नियुक्ती दिलेल्या शाळेत गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे कारण पुढे आले होते. ही माहिती शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी सदर माहिती दिली होती. त्यानंतर डिसले गुरूजींनी एका मुलाखतीत नोकरी सोडण्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, तरीही डिसले गुरूजींनी ७ जुलै रोजी राजीनामा का दिला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेचे शिक्षक (Teacher) रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप त्यांना जाहीर झाली होती. तसेच पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठातील अधिक संशोधन करण्यासाठी गुरूजींना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली. डिसले गुरूजींसहित जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती.

कोण आहेत रणजितसिंह डिसले ?

रणजितसिंह डिसले यांची जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू झाले होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्ष म्हणून कार्य केले. डिसले गुरूजींनी शिक्षण क्षेत्रात अनेक वेगवेगळे प्रयोग केले. त्यांच्या कार्याची दखल घेत ४ डिसेंबर २०२० रोजी ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT