Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: काय तो रोमान्स! चालत्या दुचाकीवर प्रेयसीने मारली मिठी; व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच दोघांना पळता भुई थोडी

तरुणी त्याला मिठी मारून दुचाकीच्या टाकीवर बसली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: वाहन चालवताना त्याचे सर्व नियम पाळणे गरजेचे असते. अन्यथा क्षुल्लक चुकांमुळे जीव धोक्यात येतो. सोशल मीडियावर सध्या प्रेमी युगलाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. एका दुचाकीवर हे दोघे आपल्याच धुंदीत फिल्मी स्टाईल रोमान्स करत चालले आहेत. हा रोमान्स दोघांनाही चांगलाच महागात पडला आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Viral Video)

प्राप्त माहितीनुसार, सदर व्हिडिओ आंध्र पदेशच्या विशाखापट्टणमचा आहे. चित्रपटात काही सीनमध्ये प्रेयसी चालत्या दुचाकीच्या टाकीवर प्रियकराला मिठी मारून बसलेली तुम्ही पाहिली असेल. व्हायरल व्हिडिओमध्ये या दोघांनी देखील असाच व्हिडिओ बनवला आहे.

यात तरुण दुचाकी चालवत आहे. तर तरुणी त्याला मिठी मारून दुचाकीच्या टाकीवर बसली आहे. मागून येणाऱ्या चारचाकी वाहनातील एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी या दोघांच्या रोमान्सवर संतप्त कमेंट करत आहेत.

हा व्हिडिओ विशाखापट्टणमच्या स्टील प्लांट रोडवरील आहे. व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याने त्यांच्यावर कलम ३३६, १३२, २७९ आणि १२९ ही कलमे लावली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र केसरी स्थगित करण्यासाठी पुणे न्यायालयात दावा दाखल

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

SCROLL FOR NEXT