Nagpur Crime saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं; मात्र तो एक शब्द ऐकूण प्रेयसीने संपवलं जीवन

तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही एकाच महाविद्यालयात कार्यरत असताना दोघांचं प्रेमाचं सुत जुळलं.

Ruchika Jadhav

Nagpur Crime: नागपूर येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने स्वत:चे जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळलाय. (Latest Nagpur News)

प्रेमात काही जण संपूर्ण जगाबरोबर लढण्याची तयारी दाखवतात. तर काहीजण आपल्या जोडीदाराला फसवतात, धोका देतात. मात्र या प्रेयसीने संपूर्ण जगाशी लढण्याची हिंम्मत या दाखवली.पण प्रियकराने परिस्थितीपासून दूर जाणे योग्य समजले. आत्महत्या केलेल्या तरुणीचे वय २८ वर्षे होते. तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही एकाच महाविद्यालयात कार्यरत असताना दोघांचं प्रेमाचं सुत जुळलं.

उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी दोघांनी घरी सांगूण लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी सांगितले तेव्हा दोघांच्या कुटुंबियांनी नकार दिला. मात्र प्रियसीने घरच्यांच्या विरोधात जाण्याची तयारी दाखवली.पण प्रियकराने घरच्यांच्या विरोधात न जाता लग्नाला नकार दिला.

प्रियकराने देखील घरच्यांना विरोध करत आपल्याशी लग्न करावे अशी तरुणीची इच्छा होती. मात्र तसं न झाल्याने ती फार दुखावली गेली. नैराश्यातून तिने घरात गळफास घेत आत्महत्या केली. शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jennifer Lopez : स्टेजवर गाणं गाता गाता अचानक स्कर्ट सरकला; प्रसिद्ध गायिकेसोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Alzheimer: अल्झायमर का होतो? सुरुवातीची लक्षणे नेमकी कोणती?

Maharashtra Live News Update: बैलगाडा स्पर्धेत 'कार्तिक आणि बकासुर' ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, तिकडे काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्याचा बदला, मास्टरमाइंडचा खात्मा

Nandurbar : पंचायत समिती इमारतीच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाची लढाई; भाजप- शिवसेना आमने सामने

SCROLL FOR NEXT