Pune News Saam TV
महाराष्ट्र

Pune News: खेळता-खेळता मुलगी ४० फुट खोल पाण्याच्या टाकीत पडली; अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवनदान

Accident News: अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ०९ वाजता एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडली. याबाबतची माहिती अग्निशमन दल नियंत्रण

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यातील (पुणे) कोंढवा भागात एक १६ वर्षीय मुलगी ४० फुट खोल पाण्याच्या टाकीत पडली. मुलीला वाचवण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या मुलीला वाचवण्यात आता यश आले आहे. मुलीला जखमी अवस्थेत यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ०९ वाजता एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडली. याबाबतची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी शोध घेतला तेव्हा ४० फुट खोल असणाऱ्या मोठ्या टाकीमध्ये वरुन पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले.

अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांनी स्वतः जवान अनिकेत गोगावले यांनी रश्शीच्या आणि शिडीच्या साह्याने जवळपास ४० फुट खोल टाकीमध्ये प्रवेश केला. तर इतर जवान वरती थांबून साहित्याची देवाणघेवाण करत होते. टाकीवर असलेल्या जवानांनी मुलीला सुरक्षितरित्या टाकीबाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

मुलगी सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलगी ४० फुट खोल पाण्याच्या टाकीत पडल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे.

विद्यार्थ्यांनी भरलेली बस झाडावर आदळली

आज सकाळी पुण्यातही अपघाताची एक भीषण घटना घडली. या घटनेत शाळकरी विद्यार्थ्यांची (Student) बस रस्त्याजवळ असलेल्या एका झाडाला धडकली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बरेच विद्यार्थी यात गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT