Girgaonkar Group stages protest with banners reading “Kabutar Go Back Marwad” amid growing tension between local Marathi residents and the Jain community over pigeon shelters in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

जैनांविरोधात 'आम्ही गिरगावकर' आक्रमक 'कबुतर, गो बॅक मारवाडचा नारा

Kabutar Go Back Marwad: कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलयं... जैन संघटांविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला... गिरगावकरांनी नेमकी काय बॅनरबाजी केलीय ? जैनांविरोधात काय भूमिका घेतलीय.

Suprim Maskar

कबुतरखान्यांचा मुद्दा शांत होण्याऐवजी आणखीनच तापलाय...विशेष म्हणजे आता हा मुद्दा मराठी विरूद्ध जैन असा रंगण्याची शक्यता आहे...कारण जैन समाजानं कबुतरांच्या मुद्यावरून थेट निवडणूकीच्या मैदानातच उतरण्याची तयारी सुरू केलीय. तर आम्ही गिरगावकर संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. कबुतर गो बॅक मारवाड अशा आशयाची पोस्टर्स व्हायरल केले आहेत. त्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

खरं तर मुंबईत 52 कबुतरखाने आहेत. या कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत... तरीही न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून जैन इमारतीच्या छतावर भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे घालतोय... त्यामुळे ठाकरेसेनेही आक्रमक झालीय..मरीन लाईन्स जवळच्या लोढांच्या क्लबमध्ये कबुतरखाना सुरु करा, असा टोला ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय. तर सत्ताधारी भाजपनं सावध भूमिका घेतलीय.

हायकोर्टानंच कबुतर खान्यांवर बंदी घातली असली तरी जैन समाजानं आपला हेका कायम ठेवलाय. एवढंच नव्हे तर मंत्री लोढांनी जैन समाजाची नाराजी दूर करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कबुतर खाने सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही गिरगावकर संघटनेनं त्या कबुतरखान्यांसमोर चिकन-मटण शॉप सुरू करण्याचा इशारा दिला होता. आता थेट जैन समाजाला गो बॅक टू मारवाड राजस्थानचा नारा दिलाय. त्यामुळे हा वाद मराठी विरूद्ध जैन असा पेटणार असल्याचं दिसतंय. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT