GBS and Chicken Connection Saam Tv
महाराष्ट्र

GBS News : चिकन खाल्ल्याने जीबीएसचा धोका? पोल्ट्री फार्मच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल, पाहा स्पेशल रिपोर्ट

GBS outbreak : चिकन खात असाल तर सावधान! कारण दूषित पाण्यामुळेच नव्हे तर चिकनमुळेबी जीबीएस आजार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. नेमकं काय आहे या अहवालात ? यावरचा हा विशेष रिपोर्ट

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

GBS Outbreak Reason: चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्ही चिकन खात असाल तर सावधान. कारण चिकन खाल्ल्याने जीबीएस होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिकन खाल्ल्याने जीबीएस होत असल्याची माहिती दिलीय. त्यामुळे चिकन प्रेमींचे धाबे दणाणले आहेत.

जीबीएस आजाराने पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरवले आहेत.. राज्यात जीबीएस रुग्णसंख्येने 200 चा आकडा पार केलाय. तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलंय. तर हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये चिकनमुळेच जीबीएस होत असल्याचं समोर आलंय. मात्र जीबीएस होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? पाहूयात.

जीबीएसबाबत काय काळजी घ्याल?

- चिकन चांगलं शिजवल्यानंतरच खा

- रस्त्यावरुन चिकन खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या

- पाणी उकळूनच प्यायला हवं

- स्वच्छ व ताजं अन्न खायसा हवं

- शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न एकत्र ठेऊ नका

जीबीएस आजार मज्जातंतूवर आघात करतो. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करुन काळजी घ्यायला हवी. अन्यथा जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीबीएसमुळे तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT