Gautami Patil Controversy: सबसे कातील गौतमी पाटील तिच्या अभिनयासह, सौंदर्याने अनेकांच्या दिलाची धडकन बनली आहे. गौतमी आणि तिचे कार्यक्रम नेहमीच वादाचा विषय ठरतात. तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणाई भान विसरुण हुल्लडबाजी आणि राडा करण्यास सुरुवात करते. असे असल्याने आता गौतमीच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. यासह गौतमीच्या आडनावावरून वाद उभा राहिला आहे. (Gautami Patil)
गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे तिने पाटील हे आडनाव वापरुनये असं म्हटलं जात आहे. ज्या व्यक्ती तिच्या आडनावाचा विरोध करत आहेत त्यांना खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटलांनी वेळीच स्वत:ला आवर घालण्याचा इशारा दिला आहे.
गौतमीच्या आडनावावरुन राज्यात राजकारण सुरु असताना आता गौतमीला खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटीलांनी पाठिंबा दिला असून ते म्हणाले की, "गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आली आहे, तिला संपवू नका. " दिलीप मोहितेपाटील त्यांच्याच वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गौतमीविषयी ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमीच्या कार्यक्रामाला होते. ऐवढा मोठा चाहाता वर्ग गौतमीचा झाला आहे. आजकाल राज्यात अनेकजण पाटील आडनाव लावत असल्याचे दाखले देत मोहितेपाटलांनी राज्यकर्त्यांना साद घालत गौतमीला (Gautami Patil) संपवू नका असं आवाहन केल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.