Pandharpur Gautami Patil Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Gautami Patil : तुम्हा बघून तोल माझा गेला...; गाणं सुरु होताच तरुणाई बिथरली, फोटो पाहून गुन्हा दाखल करण्याची धमकी

पुन्हा एकदा गौतमीच्या हुल्लडबाजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pandharpur : प्रसिद्ध डान्सर गौतमी आणि राडा याचं एक समिकरणच तयार झालं आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुण मुलं हुल्लडपणा करताना दिसतात. आता पुन्हा एकदा गौतमीच्या हुल्लडबाजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पंढरपूरमध्ये आयोजित गौतमीच्या एका कार्यक्रमात तरुणांनी मोठा राडा केलाय. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरयेथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी पाहायली मिळाली. हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. वेळापूर येथील कार्यक्रमात हा राडा झालाय. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे कार्यक्रमात व्यत्यय आला आहे.

गौतमीच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी जमली होती. अशात गौतमी स्टेजवर येण्याआधी काही साईड डान्सर येथे आल्या. त्यांचा डान्स सुरू होताच प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मात्र थोड्यावेळाने यातील काही हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.

साईड डान्सर आल्यावर तुम्हा बघून तोल माझा गेला... हे गाणं सुरू होतं. यावेळी तरुणांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे आयोजकांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना शांत राहण्यास सांगितले. मात्र तरुण ऐकत नसल्याने त्यांना धमकी देण्यात आली. तुम्ही सर्वांनी शांत रहा इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गोंधळ घालणाऱ्यांचा फोटो पाहून गुन्हा दाखल केला जाईल, असे आयोजक सांगत होते.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी १०० हून अधिक बाऊंसर, एक डझन महिला बाऊंसर तसेच ३० ते ४० पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. गर्दीवर नियंत्रण मिळवताना बाउंसरसह पोलिसांची मोठी दमछाक झाली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये या आधी देखील तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे बिरोबा यात्रेनिमीत्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या‌ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमीचे नृत्य सुरू होताच अनेक तरूणांनी येथे बँरेकेट हटवण्याचा प्रयत्न केला. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Risks: कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये?

एकच प्याला, पण तोही धोकादायक! मद्य प्राशन केल्यास गंभीर आजाराचा धोका, 31st पार्टीआधी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Mumbai Infrastructure : कायापलट होणार! बदलापूर, कर्जत ते वसई आणि पनवेल; लोकलच्या १४ प्रोजेक्टसाठी १८३६४ कोटी मंजूर, वाचा

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT