Gautami Patil On Ghanshyam Darade Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil Latest News: 'मी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम करतेय', छोटा पुढारीला गौतमीचं प्रत्युत्तर

'मी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम करतेय', छोटा पुढारीला गौतमीचं प्रत्युत्तर

भारत नागणे

Gautami Patil On Ghanshyam Darade: ''गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नका, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल'', असा इशारा घन: श्याम दराडेने प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिला दिला होता. यावरच आता गौतमीने प्रत्युत्तर दिलं आहे.

ती म्हणाली आहे की, ''मी महाराष्ट्राचा बिहार करतेय असा काही लोक चुकीचा आरोप करत आहेत, उलट मी महाराष्ट्राची लोक संस्कृती गावागावात पोचविण्याचे चांगल्या प्रकारे काम करत आहे.''

गौतमी पाटील आज सांगोला तालुक्यातील घेरडी येथे कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना तिने असं स्पष्टीकरण दिलं आहे.  (Latest Marathi News)

दोन दिवसांपूर्वी छोटा पुढारी घन:शाम दराडे यांनी गौतमी पाटील हिच्यावर निशाना साधत गौतमी पाटीलच्या नृत्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय असा थेट आरोप केला होता. याच आरोपाचं तिने खंडन केलं आहे. (gautami patil dancer)

गौतमी पाटील म्हणाली आहे की, ''मी अस काय केलं आहे की मी महाराष्ट्राचा बिहार केला आहे? असं ते लोक बोलत आहेत, मी चांगल्या पद्धतीने नृत्य सादर करत आहे. हा आरोप चुकीचा आहे.''

बार्शी मधील कार्यक्रम तिकिटावर संयोजकांनी आयोजित केला होता. आयोजक जेव्हा सांगतील तेव्हाच मी स्टेजवर जाऊन नृत्य करते. पोलिसांनी दिलेली वेळ सुद्धा पाळावी लागते. सध्या तरी माझा लग्नाचा कसलाही विचार नाही. जेव्हा तस काही ठरेल तेव्हा नक्की सांगेल, असंही गौतमी पाटीलने सांगितलं आहे. (gautami patil dancer)

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा

दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik) मंगळवारी १६ मे रोजी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशातच हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात राडा घालण्यास सुरूवात केली होती. यावेळी काही पत्रकार आणि पोलीस या तरुणांची समजूत काढण्यासाठी गेले. तेव्हा या तरुणांनी थेट पत्रकारांना मारहाण केली. या मारहाणीत पत्रकार जखमी झाले असून त्यांना मुका मार देखील लागला. यानंतर पोलिसांनी ६ हुल्लडबाजांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT