Gautami Patil Reaction On Her Surname saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil Reaction: 'पाटील' आडनाव लावणं टाळणार का? गौतमीने एका वाक्यात विषयच संपवला

Gautami Patil Latest News: पाटील आडनाव वापरून गौतमीने पाटलांची बदनामी केली असा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे.

चेतन इंगळे

Gautami Patil Reaction On Her Surname : गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रसिद्धीझोतात असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील आणि तिच्या आडनामुळे चर्चेत आली आहे. गौतमीचे चाहते तिला सबसे कातील गौतमी पाटील असे म्हणतात. मात्र आता पाटील नावामुळे गौतमीवर टीका होत आहे. पाटील आडनाव वापरून गौतमीने पाटलांची बदनामी केली असा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे.

गौतमीने आतापर्यंत तिचं खरं आडनाव लपवून ठेवलं असून ती पाटील हे आडनाव लावून फिरत असल्याचा आरोप राजेंद्र पाटील यांनी केला आहे. पाटील आडनाव वापरून गौतमीने पाटलांची बदनामी केली. तिने पाटील हे आडनाव वापरु नये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही असा इशाराही राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.

याबाबत गौतमीला विचारले असता तिने एका वाक्यात विषय संपवला. कोण काय बोलता याने मला काही, मी पाटील आहे तर पाटील आडनाव वापरणारच असे म्हणत गौतमीने राजेंद्र पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. (Gautami Patil News)

गौतमी म्हणाली, कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहणार आहे. मी पाटील आहे आणि पाटीलच नाव लावणार असेही ती म्हणाली. तसेच महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही या राजेंद्र पाटील यांच्या इशाऱ्यावर बोलताना ती म्हणाली, आता कोण काय बोलतोय याने मला फरक पडत नाही. कोणाला माझ्या कार्यक्रमाविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यावं आणि संपुर्ण कार्यक्रम पाहावा. (Breaking News)

विरारमध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा कार्यक्रम होत आहे. गौतमी पाटीलने सत्यनारायणाचे दर्शन घेतलं आणि पत्रकारांशी संवाद साधला. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांनी राडा करू नये यासाठी आता कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देखील केला जातो. अशात आता सातत्याने वादाच्या विळख्यात असलेली गौतमी पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत घनकचरा व्यवस्थापन केंद्रला लागली भीषण आग

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT