Gautami Patil dance controversy police complaint in Thane saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या नृत्यावरून नवा वाद! भाजप नगरसेविकेची थेट पोलिसांत तक्रार

Gautami Patil Viral Dance Video : ठाणे महापालिकेतील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. गौतमी पाटील आणि आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात भाजप नगरसेविकेनं केली आहे.

Bharat Jadhav

  • दहीहंडीतील गौतमी पाटील यांच्या नृत्यावरून ठाण्यात नव्या वादाला सुरुवात

  • भाजप नगरसेविका मृणाल पेंडसेंनी नौपाडा पोलिसांकडे गौतमी पाटील यांच्याविरोधात तक्रार

  • तक्रारदारांनी गौतमी पाटील यांच्यासह कार्यक्रम आयोजकांवरही कायदेशीर कारवाईची मागणी केली

विकास काटे, साम प्रतिनिधी

दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये नृत्यांगनांना नाचवण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार वाद पेटलाय. कालच पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नृत्यांगना राधा पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आपल्या दिलखेच अदांमुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील हिच्याविरोधात भाजपमधील नगरसेविकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ठाणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार केली दाखल केलीय.

पोलिसात तक्रार दिल्यानंतर मृणाल पेंडसे यांनी म्हणाले, राजकीय म्हणून मी तक्रार करण्यासाठी आलेली नाहीये. पण एक महिला म्हणून तक्रार करतेय. कोणताही राजकीय पक्ष असो आम्हाला त्याबाबत काहीही देणे घेणे नाहीये. अश्लील हावभाव, अश्लील नृत्य आणि डायलॉगबाजी गौतमी पाटील यांनी केल्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली.

माध्यमांशी बोलताना पेंडसे यांनी गौतमी पाटील यांचा एक व्हिडिओ दाखवला. यात गौतमी बोलताना दिसते की, अरे डार्लिंग लोक आहात तुम्ही माझे, इकडे मी भाऊ वगैरे मानत नाही बरं का... एक पप्पी देते तुम्हाला... चालतंय का? घ्या तेवढी". या डायलॉगबाजीवरून मृणाल पेंडसे यांनी आक्षेप घेतलाय.

अशा नृत्यांगनांमुळे सामाजिक जीवनात विकृती वाढत चालली आहे. त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली. एकीकडे वाईट प्रवृत्ती ठेचून काढण्याची आपणी मागणी करतो दुसरीकडे अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देतो, असं पेंडसे यावेळी म्हणाल्या. दरम्यान नौपाडा पोलिसांनी गौतमी पाटीलविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय. आता यानंतर पोलीस गौतमी पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल करणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

 प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलवर गुन्हा दाखल

पुण्यात दहीहंडी कार्यक्रमादरम्यान लावणी नृत्य सादर केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलीय. कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काही नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित कार्यक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT