Gautami Patil Dance Video Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil Dance Video: काय सांगता? गौतमीच्या कार्यक्रमात राडा नाही; तोबा गर्दी असूनही निर्विघ्न पार पडला कार्यक्रम, पाहा VIDEO

सर्वांनी गौतमीच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला आहे.

रोहिदास गाडगे

Gautami Patil Dance : गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की राडा आलाच, मात्र चाकण येथे गौतमीच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झालेला नाही. त्यामुळे नेटकरी चकित झाले आहेत. तिच्या या कार्यक्रमात अनेक तरुणी आणि महिला देखील उपस्थित होत्या. या सर्वांनी गौतमीच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला आहे. (Chakan)

गौतमी पाटील नाव ऐकताच डोळ्यासमोर एक सुंदर महिला आणि मोठी गर्दी असं चित्र दिसतं. गौतमीने तिच्या नृत्याच्या आणि अदाकारीच्या जोरावर संपूर्ण राज्यात प्रसिद्धि मिळवली आहे. काल चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

गौतमीचा डान्स पाहण्यासाठी फक्त तरुण मंडळीच नाही तर, वृद्ध लहान मुलं आणि महिला देखील उपस्थित होत्या. प्रचंड गर्दी असूनही यावेळी गौतमीच्या कार्यक्रमात कोणताही वाद अथवा राडा झालेला नाही. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे. गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की हाणामारी राडा या गोष्टी हमखास ऐकू येतात. मात्र आता तिने अशी काय जादू केली की या कार्यक्रमात कोणताही राडा झाला नाही याचा विचार नेटकरी करत आहेत.

सध्या चाकणच्या आसपासच्या परिसरात गौतमीचे कार्यक्रम सुरू आहेत. या ठिकाणी सर्वच कार्यक्रम निर्विघ्न पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांनी गौतमीच्या आदाकारीला चांगलाच प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT