Gautami Patil Viral Video  Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil Viral Video : गौतमी पाटीलचा 'हाय झुमका वाली पोर ' गाण्यावर हटके ठुमका; ओरिजिनल आणि हा डान्स एकदा बघाच

गौतमीचा 'हाय झुमका वाली पोर' या प्रसिद्ध गाण्यांवरील हटके ठुमका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Gautami Patil Dance Viral : राज्यासहित देशातही खानदेशी गाण्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही खानदेशी गाणे प्रचंड व्हायरल होत आहे. कोकणी माणूस असो किंवा घाटातल्या माणसांकडूनही खानदेशी गाण्यांना पसंती मिळत आहे. याचदरम्यान, सतत चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलला देखील खानदेशी गाण्यांची भुरळ असल्याचे दिसून आली आहे. गौतमीचा 'हाय झुमका वाली पोर' या प्रसिद्ध गाण्यांवरील हटके ठुमका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्यातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गौतमीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी होताना दिसते. गौतमीच्या चाहत्यांकडून कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली जाते.

खेड्यापाड्यातून तरुण मंडळी गौतमीच्या कार्यक्रमास आवर्जुन हजेरी लावतात. गौतमीचे चाहते तिच्या नाचतानाचा क्षण त्यांच्या कॅमेरात कैद करण्यासाठी आतूर असतात. गौतमीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

गौतमीचा नुकताच 'हाय झुमका वाली पोर' गाण्यावरील डान्स (Dance) तुफान व्हायरल झाला आहे. गौतमीच्या 'हाय झुमका वाली पोर' या गाण्याला तुफान पसंती मिळाली आहे. या गौतमीच्या या व्हिडिओवर (Viral Video) चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात होतोय तुफान राडा

लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेकदा तुफान राडा झाल्याचे प्रकार घडले आहेत.

हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्जही करावा लागतो. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ होते. तर आयोजकांना अनेकदा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो. तर अनेकवेळा मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढावे लागते.

गौतमी पाटीलचा मुद्दा अधिवेशनातही गाजला

गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणचं झालं आहे. गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात मोठी गर्दी उसळते. सतत चर्चेत असणारी गौतमी पाटीलचा मुद्दा विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला आहे.

भाजप आमदार उमा खापरे यांनी गौतमी पाटीलचा मुद्दा विधानपरिषदेत नाव न घेता उपस्थित केला. राज्यात लावणीच्या नावाखाली अश्लील प्रकार सूरू आहेत. असे प्रकार बंद व्हावेत यासाठी तात्काळ राज्यात लावण्यांच्या कार्यक्रमावर सेन्सॉर लावण्याची गरज आहे, अशी मागणी उमा खापरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT