Akshay Kumar opts for electric stoves as gas shortage impacts households and Bollywood alike. Saam Tv
महाराष्ट्र

गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत...; अक्षय कुमारालाही गॅसचं टेन्शन

Akshay Kumar Electric Stove Plan During Gas Shortage: गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्यांसोबतच कलाकारांचंही टेन्शन वाढलयं...गॅस टंचाईची झळ आता बॉलिवूडला बसतेय. खिलाडी अक्षय कुमारनं गॅस टंचाई सोडवण्यासाठी काय प्लॅन बी वापरलाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ऐकलतं.... जो मैं बोलता हूँ, वो मैं करता हूँ… जो मैं नहीं बोलता, वो मैं डेफिनेटली करता हूँ... असं म्हणाऱ्या अक्षय कुमारला आता घरगुती गॅस डेफिनेटली मिळेल का हेच कळत नाहीय...त्यामुळे अक्षयला गॅस टंचाईचं टेन्शन आलयं....आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी संभाव्य गॅस टंचाई टाळण्यासाठी प्लॅन बी आखलाय...आता गॅस वेळेत मिळणार नाही म्हणून अक्षय कुमारनं घरात आधीच एक नव्हे तर तब्बल दोन इलेक्ट्रिक शेगड्या विकत घेतल्यात...

अक्षय कुमारच नाही, तर अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य नागरिकही 'गॅस'ला पर्याय शोधू लागलेत... ज्यामुळे बाजारपेठेत अचानक इलेक्ट्रिक शेगड्या आणि इंडक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलीय... तर केवळ घरगुतीच नाही, तर व्यावसायिक वापरासाठीही आता अनेक हॉटेल्स् चुल आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करतायत... सध्या बाजारात 1600 ते 4500 रुपयांचे विविध इंडक्शन उपलब्ध असून प्रत्येक इंडक्शनमागे ग्राहकांना 300 ते 500 रुपये अधिकचे मोजावे लागतायत...तसंच विजेचा वाढीव खर्चही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणार आहे...

त्यामुळे जागतिक संघर्षाचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होतोय.. अशावेळी गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत सरकार काय पावलं उचलणार? ही गॅस टंचाई आणखी किती गंभीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलयं... मात्र तोपर्यंत अक्षय कुमारप्रमाणे तुम्हीही तुमचा 'प्लॅन बी' तयार ठेवलाय ना?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवारांच्या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण..

Crime news: माणुसकीला काळीमा फासणारी घटना, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Ashok Kharat Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी, VIDEO

Water Shortage : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट, 'या' भागांतील पुरवठा २४ तास राहणार बंद

Ambedkar Jayanti: आंबेडकर जंयतीला मुंबईत वाहतुकीत मोठा बदल, अनेक रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT