lpg gas cirisis Saam tv
महाराष्ट्र

गॅसमुळे कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; काम बंद आणि खाण्याचेही वांदे, VIDEO

lpg gas cirisis : गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना आता कामागारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे...गॅस मिळत नसल्यानं कामगार आपापल्या गावी जातायत... त्यामुळे उद्योगांना नेमकं काय संकट सतावू लागलयं... आणि कामगारांचे गॅस टंचाईमुळे कशी कोंडी झालीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

गॅस टंचाईमुळे कामगारांवर आता दुहेरी संकट कोसळलंय... एकीकडे गॅस टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगरमधील मद्य निर्मिती कंपन्या ठप्प होतायत..तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या या कामगारांना दैनंदिन वापरासाठी गॅस मिळत नसल्यानं त्यांच्या खाण्याचेही वांदे झालेत... संभाजीनगरमधील कंपन्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून कामगार येत असतात... मात्र हेच कामगार आता गावची वाट धरतायत....त्यामुळे साम टिव्हीनं कामगारांना गाठून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

दरम्यान कामगारांनी परतीची वाट धरल्यानं कंपनी आणि मालकांसमोरच्या अडचणीत वाढ झालीय. गॅस टंचाई कायम असतानाच व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मालकांना कसरत करावी लागत्येय. मावळमधील हॉटेल व्यावसायिकांनी चुली पेटवल्या असून ना नफा ना तोटा तत्वावर हॉटेल सुरु ठेवली आहेत.

तर चाकण एमआयडीसीतील हजारो कामगारांना गॅस मिळवण्यासाठी अक्षरशः भल्या पहाटेपासूनच लांबच लांब रांगेत तासनतास उन्हात उभं राहवं लागतयं..

एकीकडे भारतात डिजिटल इंडियाच्या गप्पा सुरु आहेत... अशावेळी दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना दोन वेळच्या जेवणासाठी गॅस मिळत नाहीये. उद्योग ठप्प झाल्यानं कामगार बेरोजगार होतायत..तर हाताला काम आणि पोटाला खायला नसल्यानं कामगारांना परत गावी जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सरकारनं वेळीच यावर तोडगा काढला नाही तर राज्यातील उद्योगधंद्यांवर याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT