gangapur sahakari sakhar karkhana saam tv
महाराष्ट्र

Gangapur Sahakari Sakhar Karkhana Election Result : गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत 'मविआ'चा दणका; भाजपच्या हाती भाेपळा

गंगापूर साखर कारखाना निवडणूकीत डोणगावकर गटाचा दणदणीत विजय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- नवनीत तापडिया

Aurangabad News : गंगापूर तालुक्यातील गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या (gangapur sahakari sakhar karkhana) संचालक मंडळाच्या निवडणुकीत (election) भाजपचे (bjp) आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब (mla prashant bamb) यांना सभासदांनी नाकारले. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने निर्विवाद यश मिळवले आहे.

गंगापूर तालुक्यातील गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच झाली. यंदा सभासदांनी भाजपचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांच्या गटास नाकारले. आमदार बंब यांचा देखील निवडणुकीत पराभव झाला.

शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने सर्व वीस जागांवर दणदणीत विजय मिळवला. गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर कारखाना निवडणुकीकडे तालुकासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनल व कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली.

यामध्ये डोणगावकर यांच्या पॅनलने सर्व जागांवर नऊशे पेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. यामुळे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांना चांगलाच झटका बसलाय. त्यांच्या गटाचे सर्व उमेदवारांना पराभवास सामाेरे जावे लागले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latakr

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT