Maharashtra Ganpati Festival 2024: Saamtv
महाराष्ट्र

Dharashiv News: गणपतीसोबत शिवरायांचंही विसर्जन करणार का? बाप्पाच्या मुर्तीवरुन शिवप्रेमींचा संताप; अखेर मूर्तीकाराने मागितली माफी

Maharashtra Ganpati Festival 2024: तसेच अशी मुर्ती विकल्यास चोख उत्तर देऊ, असा थेट इशाराही दिला होता. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मुर्तीकाराने माफी मागत मुर्ती न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे| धाराशिव, ता. ७ सप्टेंबर

Ganpati Bappa Murti Controversy: राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशमंडळे सज्ज झाली आहेत. अशातच धाराशिवमध्ये गणरायाच्या मुर्तीवरुन मोठा वाद झाल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील गणपती मुर्ती तयार केल्याने हा वाद झाला असून संभाजी ब्रिगेडने यावर आक्षेप घेत मुर्तीकारांना थेट इशारा दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये गणपती बाप्पाच्या मुर्तीवरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे. धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील मुर्ती बनवण्यात आली होती. ज्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. तसेच अशी मुर्ती विकल्यास चोख उत्तर देऊ, असा थेट इशाराही दिला होता. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मुर्तीकाराने माफी मागत मुर्ती न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराजांच्या वेशातील मुर्ती कुणीही तयार करुन विकु नका अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देण्याचा इशाराच संभाजी ब्रिगेडने दिला होता. संभाजी ब्रिगेडच्या या इशाऱ्यानंतर मुर्तीकार सुनिल घुमटे यांनी जाहीर माफी मागितली. तसेच मुर्ती न विकण्याचा निर्णय घेतला आहे. तर गणपती विसर्जनाबरोबर शिवाजी महाराजांचे ही विसर्जन करणार का? शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करु नका असा इशाराच संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील गणेशमुर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. गणपतीसोबत छत्रपती महाराजांचेही विसर्जन करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. शिवप्रेमींच्या या संतापानंतर अखेर मुर्तीकाराने माफी मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT