ganeshotsav 2023 saam tv
महाराष्ट्र

Kokan Ganeshotsav : बाप्पा इलो रे... तळकोकणात बाप्पाचं जल्लाेषात आगमन

ganeshotsav 2023 : एकूणचं सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg Ganpati Utsav :  गणपती बाप्पा माेरया... मंगलमूर्ती माेरया...एक दाेन तीन चार...गणपतीचा जयजयकार असा गणरायाचा जयघाेष करीत आज (मंगळवार) तळकोकणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. उत्सवानिमित्त भक्तांचा उत्साह दांडगा असल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

तळकोकणात (kokan) घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत भक्तीमय वातावरणात आणलं जात आहे. चाकरमानी सुद्धा तळकोकणात दाखल झाले आहेत. गणेशाेत्सवा निमित्त काेकणावासियांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 71 हजार 789 घरगुती तर 35 सार्वजनिक गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव निर्विघ्न पणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्व नियोजन करण्यात आले आहे.

एकूण 47 पोलीस अधिकारी, 250 पोलीस, आणि 350 होमगार्ड, दोन दंगल नियंत्रण पथक दिवस रात्र सुरक्षेसाठी उत्सव काळात तैनात करण्यात आली आहेत. एकूणचं सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT