Gallantry Medals Saam Tv
महाराष्ट्र

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त 1,132 जवानांना शौर्य पदके, महाराष्ट्राला किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Republic Day Gallantry Medals

प्रजासत्ताक दिन 2024 (Republic Day 2024) निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1,132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. राज्यातील अठरा कर्मचाऱ्यांना ही पदके देण्यात येणार आहेत. (Latest News)

277 शौर्य पदकांपैकी 275 जम्मू-काश्मीर पोलिसांचे 72 जवान, महाराष्ट्रातील 18 जवान, छत्तीसगडमधील 26 जवान, झारखंडमधील 23 जवान, ओडिशाचे 15 जवान, दिल्लीतील 8 जवान, सीआरपीएफच्या 65 जवानांना, 21 जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहेत. इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील SSB आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱ्यांना इतर पदके देण्यात आली आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रपती पदक/शौर्य पदक

दोन श्रेणींमध्ये 277 शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात 275 शौर्य पदके आणि दोन राष्ट्रपती पदके (Republic Day Gallantry Medals) आहेत. या 277 पैकी तब्बल 133 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील शौर्यासाठी, 119 जवानांना LWE आणि उर्वरित 25 कर्मचाऱ्यांना इतर प्रदेशातील कारवाईसाठी पुरस्कृत केले जात आहे. दोन सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसाठी (Republic Day 2024) आहेत.

विशिष्ट सेवेसाठी पदक

विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या पदकांमध्ये 102 कर्मचारी आणि नंतर अंतर्गत 753 कर्मचार्‍यांना पुरस्कृत केले जाणार आहे. 102 पदकांपैकी 94 पोलीस खाते, तर प्रत्येकी चार अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणासाठी ((Republic Day 2024) आहेत. 753 पदकांपैकी, 667 पदके पोलीस कर्मचार्‍यांसाठी आहेत, तर अग्निशमन सेवेसाठी 32 आहे. नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा या दोघांना प्रत्येकी 27 पदके मिळाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT