Gajanan Maharaj video went viral in Buldhana News Khamgaon taluka Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: खामगावात अचानक प्रगटले गजानन महाराज? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

Khamgaon Gajanan Maharaj Viral Video: या व्यक्तीची वेशभूषा पूर्णत: गजानन महाराज यांच्यासारखीच होती. त्यामुळे साक्षात गजानन महाराजच प्रकटले, अशी बातमी संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Khamgaon Gajanan Maharaj Viral Video

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एक अजब प्रकार घडला. सुटाळ पुरा गावात राहणाऱ्या अशोक सातव यांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक एक व्यक्ती आली. या व्यक्तीची वेशभूषा पूर्णत: गजानन महाराज यांच्यासारखीच होती. त्यामुळे साक्षात गजानन महाराजच प्रकटले, अशी बातमी संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली.  (Latest Marathi News)

गजानन महाराजांसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. सातव यांच्या घराभोवती भक्तांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली. बघता-बघता या परिसराला यात्रेचा स्वरूप प्राप्त झालं. शेवटी पोलिसांना ही पाचारण करावे लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील (Buldhana News) सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव यांचं घर आहे. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर गजानन महाराजांची वेशभूषा करून अचानक एक व्यक्ती आली. मला तुमच्या घरी जेवण करायचं, असं या व्यक्तीने सातव कुटुंबियांना म्हटलं.

त्यानुसार, सातव कुटुंबियांनी या व्यक्तीच्या जेवणाची सोय केली. दरम्यान, या व्यक्तीला शेजारच्यांनी जेवताना बघितलं. सातव यांच्या घरात गजानन महाराज प्रगटले, असं त्यांना वाटलं. बघता-बघता ही बातमी संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली (Viral Video).

परिसरातील नागरिकांनी वाटेल ते वाहन पकडत सुटाळपुरा गावाकडे धाव घेतली. गजानन महाराज अवतरले असं म्हणत सातव यांच्या घरासमोर भाविकांनी तुफान गर्दी केली. संत गजानन महाराजांचा जयघोष करत शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होती.

बघता-बघता या गर्दीला यात्रेचं स्वरुप आलं. दरम्यान, ही घटना कळताच खामगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी भाविकांची गर्दी हटवली. मात्र ही व्यक्ती कोण आहे..? कुठून आली..? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT