Gadchiroli : आणखी तीन नक्षली नेत्यांना कंठस्नान? पोलिसांना मोठं यश! File Photo
महाराष्ट्र

Gadchiroli : आणखी तीन नक्षली नेत्यांना कंठस्नान? पोलिसांना मोठं यश!

राज्यातील नक्षली म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तेलतुंबडे खैरलांजी आणि भीमा-कोरेगाव हिंसा घटनांचा मास्टरमाईंड मानला जातो.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

गडचिरोली : ग्यारापत्ती चकमकीत मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbe) याच्यासह जहाल नक्षली जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सुरजागड लोह प्रकल्पाच्या संदर्भात जन आंदोलन उभे करण्यासाठी नक्षली (Naxals) नेत्यांची बैठक आयोजित कारण्यात आली होती. त्यात हे सगळे मोठे केडर उपस्थित होते, अशी माहिती मिळतेय.

हे देखील पहा :

या चकमकीत 26 नक्षली ठार ठार झाले असून, यात या चार नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. पैकी मिलिंद तेलतुंबडे याची खात्री पटली आहे. उर्वरित तीन नावांना पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगलात 26 नक्षली पोलिस चकमकीत ठार झाले आहेत. राज्यातील नक्षली म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे यात ठार झाल्याच्या वृत्तास पोलीस सूत्रांचा दुजोरा मिळाला आहे.

मरदिनटोला येथील ही चकमक सुमारे 5 तास चालल्याची माहिती आली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर मोठा नक्षली तळ असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पोलीस पथकाने अभियान आरंभले होते. एकूण 26 मृत नक्षल्यात मिलिंद व्यतिरिक्त आणखी काही मोठे नक्षली नेते असल्याची शंका पोलिसांना आहे. तेलतुंबडे खैरलांजी आणि भीमा-कोरेगाव हिंसा घटनांचा मास्टरमाईंड मानला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील कित्येक मोठ्या हिंसक घटनांची मिलिंदने आखणी केली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT