gadchiroli police saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : गडचिरोली पोलीसांची माेठी कामगिरी, ४० लाखांच्या ३०० मोबाईलचा शोध

मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी गडचिरोली पोलीसांचे आभार मानले आहे.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News : गडचिरोली पोलीसांना सन २०२२ मधे जवळपास २२ लाख किंमतीचे एकुण १५० आणि सन २०२३ मध्ये जवळपास १८ लाखाहून अधिक किमतीचे एकुण १३५ हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात यश आले. बहुतांश माेबाईलधारकांना त्यांचे माेबाईल फाेन नुकतेच पाेलीसांनी परत केले. (Maharashtra News)

मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक बनलेल्या मोबाईल चोरीचे व हरविल्याच्या दररोज देशभरात लाखो तक्रारी येतात. अनेकदा चोरी गेलेला मोबाईल सापडत देखील नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत तब्बल ४० लाख किमतीचे फाेन शाेधत जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले.

सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर्षी शोधण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकांना प्रदान करण्यात आले. हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल शोधण्यात मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांचा आलेख वाढता असून २०२२ मध्ये २२ लाख किमतीचे १५० तर २०२३ मध्ये आत्तापर्यंत १८ लाख किमतीचे १३५ मोबाईल शोधण्यात त्यांना यश आले आहे.

त्यामुळे एकदा हरवलेला मोबाईल सापडत नाही, ही भावना मनातून काढून टाकत तत्काळ तक्रार केल्यास मोबाईल परत मिळू शकतो, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले. सोबतच सायबर गुन्हेगारांपासून जनतेने सावध राहावे असेही आवाहन निलोत्पल यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT