Gadchiroli Hospital News Saamtv
महाराष्ट्र

Gadchiroli News: प्रसूतीनंतर २ महिलांचा मृत्यू; गडचिरोली महिला रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, नातेवाईकांचा संताप

Gadchiroli Hospital News: दोन्ही महिलांनी जन्म दिलेल्या बाळांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Gangappa Pujari

मंगेश भांडेकर, प्रतिनिधी

Gadchiroli News:

गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळांना जन्म दिल्यानंतर या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गडचिरोली (Gadchiroli) शहरातील शासकीय महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी दोन महिला दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर काल बुधवारी सिजेरियन शस्त्रक्रिया पार पडली. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळानंतर दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

दोन्ही महिलांनी जन्म दिलेल्या बाळांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु महिलांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप समोर आले नसून याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर माधुरी किलनाके यांनी दिली आहे.

दरम्यान, गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात गडचिरोली तसेच लगतच्या चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. अशा स्थितीत अनेक रुग्ण खाली झोपून उपचार घेतात. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात महिला आणि बालमृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT