Gadchiroli Accident News Saam TV
महाराष्ट्र

Gadchiroli Accident News: दुचाकीवरून शाळेत निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; टिप्परच्या धडकेत शिक्षकाचा दुर्देवी अंत

Gadchiroli Accident News: गडचिरोली जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gadchiroli Accident News: गडचिरोली जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून शाळेत निघालेल्या आश्रम शाळेतील शिक्षकाला सुरजागड लोह खनिजाच्या अवजड ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वासुदेव कुळमेथे (४९ रा. गोमनी ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.  (Breaking Marathi News)

आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर हा अपघात (Accident) घडला. शनिवारी (२० मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत शिक्षक असलेले वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते.

दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते शहरातूनदेखील भरधाव जात असतात. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी असेच एका अवजड वाहनाने आष्टी येथे १२ वर्षीय मुलीला चिरडले होते. आता निर्दोष शिक्षकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे सूरजागड लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिक्षकाच्या मृत्युने परिसरातू हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT