Latur Fire Saam Tv
महाराष्ट्र

लातुरात अग्नितांडव! फर्निचरच्या दुकानाला आग; १० लाखांचे नुकसान

आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दीपक क्षीरसागर

Latur Fire News : लातूर (Latur) शहरातील सारोळा रोड परिसरात असलेल्या एका लाकडी अड्ड्याला शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये (Fire) फर्निचरसह दारे-खिडक्या आणि इतर साहित्य असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस (Police) ठाण्यात दुकानदाराने तक्रार दिली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

लातूर शहरातील विवेकानंद चौक परिसरात असलेल्या सरोळा रोडवर माजिद बशीरसाब शेख यांचे दारे- खिडक्या तयार करण्याचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घराकडे गेले होते.

दरम्यान, दुकानाशेजारी राहणारे पांढरे यांचा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास फोन आला. तुमच्या दुकानाला आग लागली आहे. तातडीने दुकानाकडे या, असा त्यांनी निरोप दिला. फोन ठेवताच दुकान मालकाने दुकानाकडे धाव घेतली. याबाबत अग्निशमन दलाच्या केंद्राला फोन करून माहिती दिली.

शिवाय, विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून पोलिसांनाही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत तयार करण्यात आलेले ७० दार, १५० च्यावर खिडक्या आणि त्यासाठी लागणारे इतर साहित्य असा जवळपास ९ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही. घटनास्थळी विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT