Funeral of Sunil Kawle Saam TV
महाराष्ट्र

Funeral of Sunil Kawle: सुनील कावळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप द्यायला जनसागर लोटला

Sunil Kawle News: त्यांच्या परिवारासह संपूर्ण मराठा समजावर दुःखाचा डोगर कोसळला आहे.

Ruchika Jadhav

Jalna News:

जालन्यातील अंबड तालुक्यातील चिकणगावच्या सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल मुंबईत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची बातमी गावात धडकताच गावात अस्वस्थता पसरली आहे. मराठा आरक्षणासाठी गावात झालेली ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. आज कावळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी देखील याच गावात मराठा आरक्षणासाठी सुनील खांडेभराड या तरुणाने ४ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तर सुनील कावळे यांच्या आत्महत्त्येमूळे गावकऱ्यांना आणखी धक्का बसलाय. संपूर्ण गावावर या घटनेमुळे शोककळा पसरलीय. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्या परिवारासह संपूर्ण मराठा समजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुनिल कावळे यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत दिली जाईल, तसेच कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा दिपक केसरकर यांनी केली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी आत्महत्या करत असल्याचं कावळे यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रातून स्पष्ट झालंय. मुंबईतील वांद्रे परिसरात त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कावळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT