Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News : बसल्या जागी कळेल कुठे खराब आहे जलवाहिनी, मलवाहिनी; निरीचे संशोधन

महानगरांमध्ये जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटने यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. नेमकी पाईपलाईन कुठे खराब आहे, लिकेज आहे याची खात्रीशीर माहिती मिळत नाही.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Marathi News : महानगरांमध्ये जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटने यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर याचा सर्वाधिक त्रास होतो. अशा वेळी त्या दुरुस्ती करताना बरीच दमछाक होते. नेमकी पाईपलाईन कुठे खराब आहे, लिकेज आहे याची खात्रीशीर माहिती मिळत नाही.

नागपुरातील 'निरी' अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं एक असं सॉफ्टवेअर विकसित केलंय ज्यामुळं बसल्या जागी कळेल की नेमकी कुठे जलवाहिनी, मलवाहिनी खराब आहे किंवा लिकेज आहे.  (Latest Marathi News)

निरीचे शास्त्रज्ञ आभा सारगावकर आणि आशिष शर्मा यांनी हे 'रिस्क पीनेट 2.0' हे सॉफ्टवेअर विकसित केलंय. गणितीय आधारावर हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं आहे. शहरातील सर्व जलवाहिन्या, मलवाहिन्या यांचा एक डेटा तयार करण्यात आला. यासाठी त्यांनी 'सॅफ्रा डब्लूडीएस' नावाचे पोर्टल तयार केलं. (Nagpur News)

यात शहरातील कुठे कुठे पाईपलाईन आहे, किती वर्षे जुने आहे, किती व्यासाचे आहे, किती प्रेशर आहे, कधी बदलले पाहिजे याची नकाशा सह संपूर्ण माहिती टाकण्यात आलीय. हे पोर्टल 'रिस्क पीनेट' शी जोडण्यात आले आहे.

त्यामुळं जलवाहिनी आणि सांडपाणी पाईपलाईन ची अचूक माहिती मिळते आणि काही अडचण असल्यास ती त्वरित दुरुस्त करता येते. नागपूर (Nagpur) महापालिकेसह चेन्नई, हैदराबाद आणि वर्धा प्रशासनाने या सॉफ्टवेअरचे यशस्वी प्रयोग केले आहे. भारतातील एकमेव संशोधन असून व्यावसायिक वापरासाठी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT