फेसबुकवरील मैत्री पडली महागात! बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

फेसबुकवरील मैत्री पडली महागात! बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर बलात्कार

सोशल मीडियाचा कोण कधी कसा अन् कोणत्या कामासाठी वापर करेल, याचा काही नेम नाही.

विनोद जिरे

बीड : सोशल मीडियाचा कोण कधी कसा अन् कोणत्या कामासाठी वापर करेल, याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत एकाने ३५ वर्षीय विधवा महिलेवर, लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला व नंतर मोबाइल बंद करून भेटणे टाळले. ही घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता ही ३५ वर्षीय विधवा असून, ती बीड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आपल्या १० वर्षीय मुलासोबत राहते. वर्षभरापूर्वी फेसबुकवर तिची ओळख सम्राट गित्ते रा.परळी याच्याशी झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. ६ महिन्यांपासून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू झाले होते. गेल्या ६ महिन्यांत सम्राट गित्ते याने पीडितेवर विविध ठिकाणी नेहून बलात्कार केला आहे.

एका हॉटेलात नेऊन त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ सुरू केली होती. शिवाय ४ दिवसांपासून मोबाइल बंद करून संपर्क देखील तोडला होता. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी सम्राट गीत्तेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनास्थळ हे बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा पिंपळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानचं घर नेमकं आहे तरी कुठं? जाणून घ्या

Bhandara Rain Alert : भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी

Pimpri Chinchwad Crime : 'तू जाड आहेस' म्हणून हिणवलं, शाळेतील वाद टोकाला गेला; एकाचा दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला

Bollywood Actresses : या ७ अभिनेत्री आहेत बॉलिवूडच्या 'बुलेट राणी'

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' मध्ये भाऊ कदम का नाही?

SCROLL FOR NEXT