फ्रेंडशिप डे च्या दिवशी मित्रांनीच केली मित्राची हत्या!  मंगेश मोहिते
महाराष्ट्र

फ्रेंडशिप डे च्या दिवशी मित्रांनीच केली मित्राची हत्या!

फ्रेंडशिप डे च्या दिवशी झालेल्या भांडणातून नागपूर शहरातील नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात हत्येची घटना घडली आहे. अनिकेत भोतमांगे नावाच्या तरुणाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : फ्रेंडशिप डे च्या दिवशी झालेल्या भांडणातून नागपूर शहरातील नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात हत्येची घटना घडली आहे. २१ वर्षीय अनिकेत भोतमांगे नावाच्या तरुणाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हे देखील पहा -

मृत युवकाच्या मित्राने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ऐन फ्रेंडशीप डे च्या दिवशी झालेल्या भांडणातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. नागपूर शहरातील नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात हत्येची हि घटना घडली असून, मृतक हा नागपूरच्या गड्डी गोदाम भागात राहतो. अनिकेत फ्रेंडशीप डे दिवशी सायंकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत हिवरीनगर मैदानाच्या जवळून जात असताना तिथेच असलेल्या मित्रांशी त्याचा काही कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला कि त्याच्या मित्रांनी सत्तूर ने वार करून अनिकेत ची हत्या केली.

त्यांनतर मृतक अनिकेतच्या वडिलांना त्याच्या मित्रांनी फोन करून माहिती दिली की अनिकेतला दुखापत झाली असल्यामुळे त्याला मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. अनिकेतचे वडील मेयो रुग्णालयात गेले असता त्यांना अनिकेत ची हत्या झाल्याची माहिती समजली. अनिकेतच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत ६ आरोपी असून पोलिसांनी तात्काळ या हत्येतील ५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT