Free Style Fight on Beed-Solapur Highway विनोद जिरे
महाराष्ट्र

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून महिलेसह भररस्त्यात फ्री स्टाइल मारहाण! बीडमध्ये खळबळ

जवळपास 1 तास बीड- सोलापूर महामार्गावर गोंधळ

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: पैशाच्या देवाणघेवानी वरून एका तरुणास, एकाच कुटुंबातील एका महिलेसह दोघांनी भररस्त्यात फ्री स्टाईल मारहाण केली आहे. ही घटना बीड-सोलापूर महामार्गावरील (Beed-Solapur Highway) रौऊळगाव चौकात, आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान घडली आहे. जवळपास 1 तास चाललेल्या गोंधळाने महामार्गावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली. (Free Style Fighting)

...हद्दचं पार केली;

बीड-सोलापूर महामार्गावरील अंजनवती येथील एका तरुणाकडे त्याचपरिसरातील वाणगाव येथील व्यक्तीचे पैसे आहेत. मात्र आज हे पैसे वसूल करण्यासाठी, या एकाचं कुटुंबातील तिघांनी हद्दचं पार केली. आणि तिघांनी मिळून बीड- सोलापूर महामार्गावरील रौऊळसगाव चौकात फ्री स्टाईल मारहाण केली. विशेष म्हणजे यावेळी संबंधित महिलेने त्या तरुणाला दगडाने देखील मारण्याचा प्रयत्न केला. (Beed News)

हे देखील पहा-

दरम्यान हा प्रकार जवळपास एक तास सुरूच होता. यामुळे पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर यावेळी अनेकांनी सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही केल्या हे तिघे ऐकत नसल्याचे पाहायला मिळालं. तर या पैशाच्या देवाण घेवाणीवरून भररस्त्यात या तिघांनी गुंडागर्दी केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे या तिघांवर आता कारवाई होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Cholesterol control: औषधं सोडा! तुमच्या दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस; 'या' १० अटींनुसार उपोषणाला परवानगी, जरांगेंकडून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT