Aurangabad: 10 हजारात मिळतायत बोगस कोरोना रुग्ण Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: 10 हजारात मिळतायत बोगस कोरोना रुग्ण

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोकाट हे मात्र फिरत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथ कोरोना सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  मोकाट हे मात्र फिरत आहेत. त्यांच्याऐवजी बोगस कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.बोगस कोरोना बाधित रुग्णांना 10 हजार रुपये देऊन कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. 

हे देखील पहा -

मेलट्रॉन कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून बोगस रुग्ण, तसेच पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची चाचणी केली असताना त्यामध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले.ज्यावेळी या दोन तरुणांच्या लक्षात आले की, आपल्याला कोरोनाबाधित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले आहेत त्यावेळी या दोन्ही तरुणांनी गोंधळ घालत सुटका करण्याची मागणी केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आला.

रुग्णालयात दाखल होण्यासाठी आपल्याला 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते अशी माहिती संबंधित दोन्ही तरुणांना दिली. असे असले तरी खरोखर जे रुग्ण कोविड बाधित आहेत ते मात्र, अद्याप फरार आहेत.औरंगाबाद महानगरपालिकेकडून या संपूर्ण प्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT