Crime News Saam tv
महाराष्ट्र

खोटे तारण दाखवून बँकेची तब्बल पावणे तीन कोटींची फसवणूक; तिघांच्यावर गुन्हा दाखल

बँकेच्या शाखा व्यवस्थापक रूपाली आंबेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली - युनियन बँक ऑफ इंडियाच्या मिरज तालुक्यातील अंकली शाखेत कर्जासाठी तारण मिळकतीचे अवाजवी मूल्य दाखवून खोटा मूल्यांकन अहवाल करून तब्बल दोन कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेकडून कर्ज रकमेची अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी आदित्य टेक्स्टाईल्सचे आनंद ढेकणे तसेच विजयकुमार पाटील आणि तत्कालीन बँका अधिकाऱ्यांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या शाखा व्यवस्थापक रूपाली आंबेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

हे देखील पाहा -

संशयित आनंद ढेकणे यांनी आदित्य टेक्स्टाईल साठी तसेच टेक्स्टाईल मशिनरी खरेदीसाठी 2016 मध्ये तीन कोटी रुपयाचे कर्ज प्रकरण दाखल केले होते. कर्ज प्रकरणासाठी तारण म्हणून प्लॉट्स दाखवले होते आणि याची रक्कम चार कोटी 73 लाख रुपये किंमतीची नसतानासुद्धा तेवढ्या किमतीची दाखवली होती. त्यासाठी सांगलीतील विजयकुमार पाटील यांच्याशी संगनमत करून चार कोटी 73 लाख रुपये इतके मूल्यांकन असल्याचा अहवाल बनवला. हा खोटा मूल्यांकन अहवाल ढेकणे यांनी कर्ज मंजुरीसाठी सादर केला होता.

कर्ज प्रकरणासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता तारण म्हणून दिलेल्या मिळकतीचे मूल्य एक कोटी 1 लाख 62 हजार रुपये इतकी असल्याचे दिसून आले. तरीसुद्धा ढेकणे यांनी बँकेच्या पुणे विभागीय कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत केले. त्यातून ढेकणे यांनी आदित्य टेक्स्टाईल साठी दोन कोटी 70 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर चीन येथील एका कंपनीकडून टेक्स्टाईल व्यवसायास लागणारे मशीन खरेदीसाठी एक कोटी रुपये पाठवण्यास सांगितले. प्रत्यक्षात या कंपनीकडून कोणतीही मशिनरी खरेदी केली नाही.

तरी बँकेकडून कॅश क्रेडीट द्वारे एक कोटी 70 लाख रुपये कर्ज उचलले. बँकेकडून व्यवसाय व मशनेर खरेदीसाठी दोन कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे बँकेच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे शाखा व्यवस्थापक आंबेडकर यांनी ढेकणे पाटील आणि तत्कालीन अधिकाऱ्यांच्या विरोधात बँकेची फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दिली त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: सीसीटीव्हीचा 100% निकाल देणाऱ्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Kairichi Kadhi Recipe : उन्हाळ्यात करा कोकणी मेजवानी; गरमागरम भात अन् कैरीची आंबट-गोड कढी, जणू स्वर्ग सुखच

SCROLL FOR NEXT