राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक सहा वर्षासाठी निलंबित Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक सहा वर्षासाठी निलंबित

हे सर्व नगरसेवक हे तुळजापूर विधानसभेचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत काम करत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद - तुळजापूर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह इतर 14 नगरसेवकांवर कारवाई करत जिल्ह्यातील राष्ट्रवादीने यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्याने या नगरसेवकांना 6 वर्षाकरिता निलंबित केलं असून हे सर्व नगरसेवक हे तुळजापूर विधानसभेचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत काम करत होते.

हे देखील पहा-

पाटील यांच्या पक्ष बदला नंतर 2019 च्या विधानसभेपासून वारंवार पक्ष विरोधात काम करत असल्यामुळे व पक्षाच्या 2019 पासून कोणत्याही बैठकीस हजर राहिल्या नसल्यामुळे यांना निलंबित करण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. पक्ष जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे,ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

यात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या सह विनोद (पिंटू) गंगणे, नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, औदुंबर कदम, पंडित जगदाळे,चंद्रकांत कणे, मंजुषा देशमाने, किशोर साठे,आशाताई विनोद पलंगे,विजय कंदले,रेशमा गंगणे, वैशाली कदम,भारती गवळी, अश्विनी रोचकरी या सदस्यांना निलंबित करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT