Sangli Womens Saam TV
महाराष्ट्र

Sangli : पुरुषांनी खांदा देण्याची परंपरा टाळून, चार महिलांनी दिला मृतदेहाला खांदा

वय वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांच्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह दहनाकर्ता घेऊन जाताना खांदा देण्याची प्रथा आहे. मात्र या वेळी खांदेकरी हे नेहमी पुरुष असतात मात्र सांगलीमध्ये (Sangli) चक्क स्त्रीयांनी मयताला खांदा दिला आहे.

नुकताच दोन दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन (World Women's Day) झाला आणि काल वय वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांच्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजीच्या दुःखद निधनानंतर नात ज्योती आधाटे, प्रियांका तुपलोंढे राणी कदम, सुजाता दळवी या महिलांनी चक्क मयताला खांदा दिला. तर प्रत्यक्षात मयत तानुबाई चव्हाण यांच्या मुलीने प्रभावती आधाटे यांनी शिकाली धरली होती.

क्रांतिकारी बदल म्हणजे त्यांना गॅस दाहिनी मध्ये घेऊन जात असताना पुरुषी खांदा देण्याची परंपरा टाळून चार महिलांनी त्यांच्या मृतदेहाला (Corpses) खांदा दिला. हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल सांगलीकारांनी काल पाहिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT