Police crime in latur Saam Tv
महाराष्ट्र

शेजाऱ्यांनी तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या, पोलिसांना नरबळीचा संशय, जंगलात काय घडलं?

पूर्व वैमनस्यातून एका तरूणाची हत्या घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नांदेड : येथे पूर्व वैमनस्यातून एका तरूणाची हत्या घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या चौघांनी तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील वाशी येथील जंगलात घडली आहे. पांडूरंग तोटेवार असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस (Police) ठाण्यातल हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Four neighbors kills a man in forest)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाला जीवे मारण्याच्या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शेजारच्या चार जणांनी पांडूरंग तोटेवार या व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पांडूरंगच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी परमेश्वर आकलवाड, लक्ष्मण आकलवाड, रमेश आकलवाड आणि लक्ष्मीबाई आकलवाड या चार आरोपींना अटक केली आहे. पांडूरंगला हे चारही आरोपी रिक्षातून वाशी येथील जंगलात घेऊन गेले आणि त्यानंतर पांडूरंगची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी लिंबू,फुलं,कुंकू आढळून आल्याने नरबळीचा प्रकार आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे अंतरवाली सराटी येथे दाखल

Kidney health: किडनीच्या आजाराने त्रस्त आहात? मग या 5 पदार्थांपासून राहा चार हात लांब

Salary Hike : कंपनी तुमचा पगार का वाढवत नाही? या 5 चुका तुम्ही तर करत नाही ना?

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? मुंबईतील बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात भूकंप; 'इतके' आमदार शिंदेंसेनेच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT