dharashiv  Saam tv
महाराष्ट्र

विहिरीतून मोटार काढताना विपरीत घडलं; शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू, धाराशिवात हळहळ

dharashiv shocking news : विहिरीतून मोटार काढताना धाराशिवात दुर्दैवी घटना घडली आहे. धाराशिवात शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

धाराशिवातून घडली एक हृदयद्रावक घटना

शॉक लागून चौघांचा मृत्यू

शॉक लागल्याने बाप लेकासह दोन मजूर जागीच ठार

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिवातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. धाराशिवच्या शॉक लागून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शॉक लागल्याने बाप लेकासह दोन मजूर जागीच ठार झाले. चौघांच्या मृत्यूने संपूर्ण धाराशिवात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव शिवारात शॉक लागून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतातील बोअरची दुरूस्ती करताना विजेचा धक्का लागल्याने बाप लेकासह दोन मजूर दगावले. शेतातील विहिरीतील पाणबुडी मोटार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढताना क्रेनच्या महावितरणच्या विद्युत तारेचा धक्का बसल्याने ही दुर्घटना घडली.

क्रेनच्या साहाय्याने विद्युत प्रवाह खाली उतरला. त्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शेतकरी नागनाथ काशिनाथ साखरे (वय 52), रामलिंग नागनाथ साखरे (वय 25) तर मजुर काशिम फुलारी (वय 55) रत्न काशिम फुलारी (वय 16) यांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेआहेत. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

वर्ध्यात महिला प्रसाधनगृहात सापडले मृत अर्भक

वर्धा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात महिला प्रसाधनगृहात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील सफाई कर्मचारी सकाळी प्रसाधन गृहात सफाई करत होते. त्यावेळी सफाई कर्मचाऱ्याला रक्ताच्या थारोळ्यातील अर्भक आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुरुष जातीचे अर्भक आहे की महिला जातीचे आहे, याबाबत अद्याप कळू शकले नाही. हे अर्भक डीएनएसाठी पाठविण्यात आलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT