Dharashiv Latest News Update 
महाराष्ट्र

Dharashiv Rada : मध्यरात्री थरार, २ गट भिडले; इतका टोकाचा वाद की चौघांचा गेला जीव, कारण भलतंच!

Dharashiv Clash News : धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला समाविष्ट आहे.

Namdeo Kumbhar

Dharashiv Latest News Update : धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार शेतातील पाण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला.

धाराशिवमध्ये मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. शेतामध्ये पाठी देण्यावरून दोन गटात वाद झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आलेय. धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पिडी येथे ही घटना घडली आहे. मारहाणीमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. अनेकजण यामध्ये जखमी झाले आहेत. मृतामध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी येथील येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. येरमाळा पोलिसांनी 10 आरोपींना संशियत म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. फक्त शेतामधील पाणी हेच वादाचे कारण आहे की दुसरं काही, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT