Beed Saam Tv
महाराष्ट्र

वाळू माफियांच्या वाळू उपश्याने घेतला चार मुलांचा बळी, खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

खेळण्यासाठी गेल्या चार मुलांचा वाळूसाठी केलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

विनोद जिरे

बीड - वाळू माफियांच्या वाळू उपश्याने चार चिमुकल्या मुलांचा बळी घेतलाय. खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा वाळू उपसा केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात असणाऱ्या शहाजनपुर चकला या गावातील सिंदफणा नदी पात्रात, सातच्या दरम्यान घडली असून रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान उघडकीस आली आहे. बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर अशी मृत मुलांची नावे असून ही सर्व मुले 9 ते 13 वयोगटातील आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडाली असून सध्या सिंदफना नदी पात्रात शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली आहे . घटनास्थळी नागरिक आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी येऊन वाळू माफियांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळं घटनास्थळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT