कन्हान नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला; चौघांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

कन्हान नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला; चौघांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय डाफ

नागपूर - सावनेर Savner तालुक्यातील वाकी Waki परिसरात सहलीला आलेल्या नागपूर Nagpur येथील चार मित्रांचा बुडून मृत्यू Death झाल्याची घटना घडली आहे. कन्हान नदी River पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चौघांना डोह असल्याचा अंदाज न आल्याने जलसमाधी drowned मिळाली. यातील एक युवकाचा मृतदेह सापडला असून तिघांचा शोध सुरू आहे. four boys drowned at waki river in nagpur

तोफीक आशिफ खान, प्रविण गलोरकर, अवेश शेख नासीर शेख आणि आरिफ अकबर पटेल अशी मृतकांची नावे असून अवेश शेख नासीर शेख यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

हे देखील पहा -

प्राथमिक माहितीनुसार, नागपूरातील एकूण आठ तरुण वाकी येथे सहलीला गेले होते. त्यांनी कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचे ठरवले. आठही जण कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. नदीजवळ पोहोचताच आणि वाहते पाणी पाहून ४ मुलांनी पोहायचे ठरवले. त्यानुसार ८ पैकी ४ युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र या ४ युवकांना पाण्याचा अंदाज लावता न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांच्या मित्रांचा जीव वाचवता आला नाही.four boys drowned at waki river in nagpur

माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. मात्र, एका युवकाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगट डोह आहे.

आजवर अनेकांचा या डोहात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी याची माहिती देणारे सूचना फलक देखील लावण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी सुद्धा येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडत असतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT