shani shingnapur News Saam tv
महाराष्ट्र

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Shani Shingnapur News update : शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केली.

नितीन शेटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देवस्थानशी संबंधित बनावट अ‍ॅप प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच ही घटना घडली.

नितीन शेटे यांच्यावर कोणतीही चौकशी अथवा समन्स नव्हते, अशी माहीती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

सुशील थोरात, साम टीव्ही

शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता ही बाब उघडकीस आली. दरम्यान त्याच्या आत्महत्येनंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नितीन शेटे हे 2021 पासून शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या देवस्थानच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अँप प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. त्यामुळे जर शेटे यांच्यावर चौकशीचा सासेमीरा नव्हता तर त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.

खरंतर शेटे यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून कोणतीही नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण देवस्थान परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT