Nilesh Rane, Bhaksar Jadhav, Sindhudurg saam tv
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यानंतर नीलेश राणेंना शंका; म्हणाले, हा ढोंगी माणूस...

गेले दाेन दिवसांपासून काेकणातील नेते एकमेकांवर टीका करु लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधव हा ढोंगी माणूस आहे. त्याची ती दोन रिकामटेकडी मुलं आहेत, त्यांना सांगून दगड फेकायला लावले असतील अशी खाेचक टीका भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार जाधव यांचा समाचार घेतला. (Nilesh Rane Latest Marathi News)

माजी खासदार नीलेश राणे म्हणाले मी तर अजून पर्यंत काही गोष्टी फक्त सोशल मीडियावर पाहिल्या. हल्ला झाला की त्यांनी स्वतःहून तो हल्ला स्वतःवर केला अगोदर तपास झाला पाहिजे. याचे कारण म्हणजे भास्कर जाधव इतका ढोंगी आहे. त्याने स्वतःची पोलीस प्रोटेक्शन वाढवण्यासाठी सिंधुदुर्गाची (sindhudurg) सभा केली. (Breaking Marathi News)

तो इतका घाबरला की जेवढ्या लवकरात लवकर गोव्याला सटकता आलं तेवढ्या लवकर तो गोव्याला सटकणार असंही माजी खासदार नीलेश राणेंनी (Nilesh Rane) नमूद केले. एवढा जर घाबरणारा भास्कर जाधव (bhaskar jadhav) असेल तर त्याने हा सगळा प्रकार स्वतः घडवला असणार स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हा प्रकार घडवला असेल. ढोंगी माणूस आहे ताे. त्याची ती दोन रिकामटेकडी मुलं आहेत त्यांना सांगून दगड फेकायला लावले असतील असेही राणेंनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT